गणेश भांड यांचा शिवसेना मध्ये प्रवेश ! विखे पाटलांचे समर्थक थेट शिंदे गटात…

Published on -

देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी रविवारी रात्री शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.गणेश भांड हे विखे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

त्यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर सुरू होता. अखेर या चर्चेला मूर्त स्वरूप मिळाले आणि त्यांनी शिंदे गटाचा झेंडा स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत शिवसेनेचा पंचा त्यांच्या खांद्यावर घातला.

कार्यक्रमावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, आमदार मनीषा कायंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव, पांडुरंग महाराज वावीकर, शहरप्रमुख गंगाधर सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गणेश भांड यांच्या समवेत संदीप भांड, गोपाल शिंदे, प्रमोद बर्डे, संतोष येवले, संतोष घाडगे, कृष्णा भुजाडी, अर्जुन शेटे, चांगदेव खांदे, सुनील भांड, निलेश कुंभार, प्रतीक घोलप, गौरव भांड, सुमेध भांड, सोमा इथापे, सलीम शेख, कृष्णा कोबरणे, किशोर मोरे, अशोक गावडे, राजेंद्र सांगळे, सीताराम येवले, हरिभाऊ हापसे, रविंद्र बोरुडे, किरण देशमुख यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!