अहमदनगर : सावेडीगावात वादग्रस्त जागेच्या मोजणीच्या कारणावरून दोन गटात मारहाणीची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पद्मा विलास भिंगारदिवे व सिंधु मधुकर भिंगारदिवे यांनी त्यांच्या वादग्रस्त घराची मोजणी करण्याकरीता कोर्ट कमिशन बोलाविले होते. त्यासाठी तेथे राकेश दादु भिंगारदिवे (वय १९, रा. सध्या बोल्हेगाव, राघवेंद्र मंदिराजवळ, मुळ रा. सावेडी) हा तेथे गेला असता तेथे पद्मा भिंगारदिवे व सिंधु भिंगारदिवे यांच्यात वाद झाला. त्या वादामुळे कोर्ट कमिशनचे वकील तेथुन निघुन गेले. त्याचा राग येऊन विरेन मधुकर भिंगारदिवे,

आकाश सॉलोमन जाधव, मधुकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पद्मा विलास भिंगारदिवे, कलावती शाहु भिंगारदिवे, सिंधु मधुकर भिंगारदिवे, राणी मधुकर भिंगारदिवे, राजेश सॉलोमन जाधव (सर्व रा. सावेडी) यांनी राकेश भिंगारदिवे व त्यांच्या सहकाऱ्यावर दगडफेक करून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यामध्ये राकेश भिंगारदिवे हा जखमी झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी राकेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार भोसले हे करीत आहेत.
तर दुसऱ्या फिर्यादित मधुकर दयानंद भिंगारदिवे (वय ६०) यांनी म्हटले आहे की, जागेच्या वादाच्या कारणावरून राकेश दादु भिंगारदिवे, श्रीकांत चंद्रकांत आल्हाट, महादु लक्ष्मण भिंगारदिवे, रंजना चंद्रकांत आल्हाट, सीमा उर्फ पिंकी निकाळजे, आशा दादु भिंगारदिवे,
रेणुका महादु भिंगारदिवे, दीपक फकीरा पवार, आकाश फकीरा पवार यांनी एकत्रित येवुन लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मधुकर भिंगारदिवे त्यांची पत्नी सिंधु भिंगारदिवे व मुलास मारहाण केली. शिवीगाळ करून तुम्हास तलवारीने कापुन टाकीन, अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीत मधुकर भिंगारदिवे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी मधुकर भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे.कॉ. गाजरे हे करीत आहेत.
- पाच पिढ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली! अखेर निळवंडेचे पाणी पोहोचले दहेगावात, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू
- तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार ! तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट
- गोदावरी नदी किती खोल आहे? वाचा, भारतातील सर्वात खोल 10 नद्यांची यादी
- अहिल्यानगरमधील अवैध कत्तलखाने आणि मशिदींवरील भोंगे तात्काळ हटवा, अन्यथा उपोषण करण्याचा संजय मरकड यांचा इशारा
- लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 2100 नाही तर ‘या’ महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार 3 हजार रुपये