अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-आज आपण समाजात पहिले तर मुली कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या मुली लढत आहेत.
पुनरुषांइतकेच नव्हे नव्हे तर पुरुषांपेक्षाही काकणभर सरस कामगिरी महिला करताना दिसत आहेत. महिलांना बऱ्याचदा ‘अबला’ असे म्हणून त्यांना दुर्लक्षित केले जाते. परंतु काही महिला अशा असतात की परिस्थितीलाही आपल्या कर्तबगारीने घाम फोडतात.
आणि शून्यातून विश्व निर्माण करतात. अशीच मोठी आणि पुरुषांनाही लाजवेल अशी कामगिरी पारनेरच्या श्रद्धा नावाच्या मुलीने केली आहे. तिने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत 1 नाही 2 नाही तर तब्बल 60 म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणारी श्रद्धा ढवण ही मुलीकादेवी महाविद्यालयात श्रद्धा TYBSc मध्ये शिक्षण घेत आहे. श्रद्धाचे वडील दिव्यांग, लहान बहीण पुण्यात शिक्षण घेत आहे तर भाऊ दहावीत शिकत आहे.
त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आला. त्यामुळे घरी असलेल्या 4 म्हशींचा सुरुवातीला श्रद्धाने सांभाळ केला. आणि हळूहळू तब्बल 60 म्हशींचा सांभाळ श्रद्धाने सुरु केला.
श्रद्धाचा दोनमजली गोठा हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम:- श्रद्धा ही पहिल्यापासून उपक्रमशील. त्यातून तिची दूरदृष्टी वाढत गेली. तिने तिचा म्हशींचा सांभाळ करता करता तिने या म्हशींसाठी 2 मजली गोठा बांधला. म्हशींसाठी 2 मजली गोठा जिल्ह्यात पहिलाच उपक्रम आहे.
असा आहे श्रद्धाचा दिनक्रम:- पहाटे लवकर उठून स्वतः चे आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर नेऊन घालणे हे कामे श्रद्धा करते. म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा रोजचा दिनक्रम आहे.
अबला नव्हे रणरागिणी:- श्रद्धा कडे पाहून सर्वांनाच तिचा अभिमान वाटतो. श्रद्धाने स्त्री हि अबला नसून स्वतःच्या कर्तबगारीने जगातील कोणतेही शिखर पादाक्रांत करण्याची शक्ती आहे हे सिद्ध केले आहे. सध्या पंचक्रोशीत श्रद्धाकडे पाहून लोक कौतुकाने ‘ती’ अबला नव्हे रणरागिणी आहे असे म्हणतात.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved