शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- तालुक्यातील दाढ खुर्द येथे बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले शेतकरी प्रकाश तुळशीराम गिते (वय ४६) यांच्यावर बिबट्याने sangहल्ला करून गंभीर जखमी केले.

त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकरी प्रकाश गिते हे प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या गट नं. २३८ मधील पिकाला पाणी भरत होते.

यावेळी गिन्नी गवतात भक्षाच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बारे देण्यासाठी खाली वाकलेल्या गिते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घाबरलेल्या गिते यांनी आरडाओरडा करत हातातील फावड्याने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत तेथून पळ काढला.

परंतु, खवळलेल्या बिबट्याने गिते यांचा पाठलाग सुरु केला. यामुळे गिते यांनी पुन्हा बिबट्याचा प्रतिकार सुरु केल्याने बिबट्याने अखेर तेथून धूम ठोकली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment