नगरपरिषदेच्या खात्यात 11 कोटींचा निधी वर्ग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पातील ९३३ लाभार्थ्यांचे प्रलंबित ११ कोटींचे अनुदान राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने जामखेड नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग झाले.

या प्रकल्पाचे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित होते. रखडलेल्या अनुदानासंदर्भात आमदार पवारांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा केली.

१९ नोव्हेंबरला गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांशी पवार यांनी पत्रव्यवहार केला. त्यांनी तत्काळ दखल घेत प्रलंबित अनुदान वितरित करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले.

२४ नोव्हेंबरला लेखाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाकडील पहिल्या टप्प्याचे ११ कोटी १९ लक्ष ६० हजार अनुदान नगर परिषदेच्या खात्यामध्ये वितरित केले.

संबंधित लाभार्थ्यांना लवकरच त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe