अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी-पोखर्डी बस स्टॅण्डजवळील इलेक्ट्रीकल व हार्डवेअर दुकानाला बुधवारी (दि.19) रात्री लागलेल्या आगीत इलेक्ट्रीकल मटेरियल व अॅग्रीकल्चरचे, दुकानाचे फर्निचर जळून खाक झाले.
या शेजारीच असलेल्या पंचशिल मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागल्याने यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, फर्निचर जळून गेले.
रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास अचानक दुकानातून आगीचे लोळ शटरखालून दिसल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाची गाडी बोलावून तासाभरात आग आटोक्यात आणली.
समर्थ इलेक्ट्रीकलचे राजेंद्र निमसे व पंचशिल गॅलरी शॉपीचे संजय मालुसरे यांना या आगीची माहिती गावकर्यांनी देताच ते लगेच घटनास्थळी आले, तोपर्यंत सर्व होत्याच नव्हत झाले होते.
यामध्ये निमसे यांचे दहा ते साडेदहा लाखांचे तर मालुसरे यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करुन शॉर्ट सर्कीटने आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला.
पुढील तपास पोलिस करीत असून, व्यावसायिकांवर आधीच लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती उद्भवलेली असतांना या घटनेमुळे गावात दु:ख व्यक्त होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved