14 जागा बिनविरोध तर एक जागा रिक्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नेवासा तालुक्यातील खरवंडी ग्रामस्थांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे खरवंडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

15 पैकी 14 जागांवर उमेदवार शिल्लक राहिल्याने या सर्व 14 जागा बिनविरोध निवडून आल्या तर एक जागा रिक्त राहिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खरवंडी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी अर्ज सादर करण्यापूर्वी घेतला होता.

दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवून सर्व 15 उमेदवार निश्‍चित करण्यात आले होते मात्र 15 जागांसाठी एकूण 17 अर्ज भरण्यात आले होते.

प्रभाग 3 व प्रभाग4 मधून प्रत्येकी एक उमेदवार अधिक होता. प्रभाग 3 मधील वैभव बाळासाहेब फाटके व प्रभाग 4 मधील सुरेश केरु कातोरे यांनी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

प्रभाग क्र. एक मधील ओबीसी महिला प्रवर्गासाठीच्या जागेसाठी विद्यमान सदस्य यमुनाबाई विश्‍वनाथ कुर्‍हे यांचे नाव निश्‍चित होवून त्यांनी अर्ज भरलेला होता.

मात्र गेल्या निवडणुकीचा निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याच्या कारणावरुन त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. त्यामुळे प्रभाग एकमधील ओबीसी महिला या प्रवर्गाची एक जागा रिक्त राहिली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment