अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- ऑक्टोबर महिन्यात पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरवला आहे. जिरायत, बागायतसह फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले.
ऑक्टोबरमधील नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाने युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.
या आहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार १६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यात तब्बल २ लाख ३० हजार ११२ शेतकरी बाधित झाले आहेत.
या नुकसानभरपाईसाठी १५६ कोटी ११ लाखांचा निधी मिळणे अपेक्षीत असून याबाबतचा अहवाल पाठविला आहे. मागील १८ वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक मोडीत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.
या पावसाने चालू महिन्याअखेरपर्यत जिल्ह्यात ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने एकूण १ लाख ६४ हजार १६० हेक्टर क्षेत्रास फटका बसला आहे. यात २ लाख३० हजार ११२ शेतकरी बाधित झाले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved