विषबाधा झाल्याने १७० मेंढ्या मृत्युमुखी, अहंदनगरमधील धनगर बांधवांवर संकटांचा डोंगर

Ahmednagarlive24 office
Published:

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील धनगर मेंढपाळ संतोष काळूराम बरकडे यांच्या १७० मेंढ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्या दगावल्याची घटना मंगळवारी (दि.३० जानेवारी) दुपारी घडली. या घटनेत या शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील संतोष काळूराम बरकडे हे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तेथे मंगळवारी दुपारी १७० मेंढ्यांना अन्नामधून विषबाधा होऊन त्या मृत्युमुखी पडल्या.

अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे मृत मेंढ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या संकटातून बाहेर काढण्यास सर्वांनी एकजुटीने मदत केली करावी, तसेच या कुटुंबाला सरकारकडूनही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe