अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या ५८३ सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया काल नगर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निरीक्षक उपजिल्हाधिकारी सोपानराव कासार, नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या प्रक्रियेत एकूण ४६ अर्ज बाद झाले असून १ हजार ८८५ अर्ज वैध ठरले. दरम्यान सात सदस्यीय वारूळवाडी ग्रामपंचायतीसाठी दाखल झालेले सात अर्ज छाननीनंतर वैध ठरल्याने नगर तालुक्यातील हि एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत.नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या निर्देशानुसार तहसीलदार उमेश पाटील यांनी निवडणूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. दि. २३ पासून संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. अंतिम मुदतीपर्यंत ५९ ग्रामपंचायतींसाठी एक हजार ९३१ अर्ज दाखल झाले होते.
ग्रामपंचायत निहाय स्वतंत्ररित्या उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. काल उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया संपन्न झाली.
यात एकूण ४६ अर्ज बाद झाल्यानेअर्ज दाखल करणारे इच्छूक निवडणूक रिंगणाबाहेर फेकले गेले. दरम्यान अर्ज माघारीची मुदत येत्या दि.४ जानेवारी दुपारपर्यंत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.तो पर्यंत मनधरणी सुरु राहील.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve