लाच घेताना 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- शिर्डी पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.२५) रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहेत.

विशेष म्हणजे ‘पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर थेट वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा’, अशा स्वरूपाचा फलक शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये दहा दिवसांपूर्वी लावण्यात आला होता.

काल सोमवार दि. 25 रोजी दुपारी शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब यशवंत सातपुते (वय 38) तसेच पोलीस हवालदार प्रसाद पांडुरंग साळवे (वय ४९) अशी आरोपींची नावे असून

पोलीस नाईक सातपुते यांनी हवालदार साळवे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 17 जानेवारी रोजी पाच हजार रुपयांची मागणी करून पोलीस नाईक सातपुते याने काल सोमवारी लाचेच्या रकमेपैकी दोन हजार रुपयांची लाच शिर्डी पोलीस ठाण्यात पंच व साक्षीदारांच्या समक्ष स्वीकारीत असताना

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईमुळे शिर्डी पोलिसांमध्ये दहशत तसेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.