दोन पोलिसांसह श्रीरामपूर तालुक्यात 21 पॉझिटीव्ह

Published on -

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा २३८ वर जावून पोहोचला आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 949 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. त्यातील 615 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

कोरोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काल आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या 103 रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

यात दोन पोलिसांचा समावेश आहे. या २१ पॉझिटीव्ह रुग्णात सुभाष कॉलनीतील 8, मोरगे वस्ती 4, वॉर्ड नं.चार-2, म्हाडा परिसर 1, वॉर्ड नं. दोन मध्ये 1, वॉर्ड नं. 7 मध्ये 1, बेलापूर-1,

नरसाळी-1, निमगाव खैरी-1 रुग्णांचा समावेश आहे. सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये 56 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आंबेडकर वसतिगृहात 40 जणांना क्कारंटाईन करण्यात आले आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe