अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कर्जत शहरातील अनेक पानटपरीधारक अवैधपणे सुगंधित मावा, तंबाखू यासारखे पदार्थ विक्री करून जनतेच्या व तरुणाच्या आरोग्यास धोका निर्माण करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच वेगवेगळ्या टीम तयार करून दि.११ रोजी दुपारी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकला असता.
येथील तीन पान टपरीधारक हे बेकायदेशीररित्या पानमसाला, सुगंधित तंबाखू विक्री करताना व त्यांचे दुकानात विक्रीसाठी ठेवताना हे दुकानदार मिळून आले.
पोलिसांनी यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई केली असून ३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदर ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून ३१ हजार ७५० रुपयांच्या मुद्देमाल, मावा तयार करण्याच्या मशीन सह जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी, आण्णासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,
पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाट, पोलीस अमलदार महादेव गाढे, सुनील माळशिकारे, सुनील खैरे, विकास चंदन शाम जाधव, महादेव कोहक, गोवर्धन कदम,
बळीराम काकडे,मनोज लातूरकर, महिला पोलीस अमलदार जयश्री गायकवाड, राणी व्यवहारे, कोमल गोफणे यांनी केली. पुढील तपास कर्जत पोलिस करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved