अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील रस्त्यांवरील खड्डे यामुळे अनेकदा आंदोलने झाली. मात्र आता खासदार सुजय विखे यांनी एक खुशखबर समोर आणली आहे.
खड्ड्यात हरविलेल्या नगर ते कोपरगाव या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यातील सावळिविहीर ते नगरपर्यंतच्या अंतरातील कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साडे चारशे कोटी रूपयांचा निधी मंजुर केला. जेथे गरज आहे
तेथे काॅक्रीटीकरण व अन्य ठिकाणी डांबरीकरण अशा पध्दतीने हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला जाईल. येत्या चार ते पाच महिन्यात या कामास प्रारंभ होईल. अशी माहिती खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी गणेश कारखाना गाळप हंगामाच्या प्रारंभी पत्रकारांशी बोलताना दिली.
आपल्या वर्षभराच्या पाठपूराव्याला यश आले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याबाबतच्या कागदोपत्री पुर्तता करण्याच्या सुचना सबंधित अधिका-यांना दिल्या होत्या. या पूर्ततेनंतर त्यांनी पुढाकार घेऊन, राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने कामाचा आराखडा देखील तयार केला.
160 क्रमांकाचा हा राष्ट्रीय महामार्ग सिन्नर-सावळिविहीरफाटा ते अहमदनगर असा आहे. आता राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे काम होणार असल्याने यावरून प्रवास करणा-यांची सध्याच्या त्रासातून मुक्तता होईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved