राज्य शासनाने दिलेल्या ८४ कोटींच्या निधीतील ११४ पैकी ५० टक्के कामे पूर्ण! तीन महिन्यात सर्व कामे पूर्ण होणार; महानगरपालिकेचे नियोजन

अहिल्यानगर – राज्य शासनाने अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागात कामांसाठी दिलेल्या सुमारे ८४ कोटी रुपयांच्या निधीतील सर्व ११४ कामे सुरू झाली आहेत. यातील ५० टक्के कामे पूर्णही करण्यात आली आहेत. उर्वरित कामे येत्या तीन महिन्यात पूर्ण होतील. त्या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

राज्य शासनाने नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधा देणे या लेखाशीर्ष अंतर्गत सुमारे ८४ कोटी रुपये निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे यात रस्ते, ड्रेनेज, गटारीची ९८, वॉल कंपाऊंड ५, ओपन स्पेस व उद्याने ८, नाल्यालगत परिसर सुशोभिकारण करणे १, सभा मंडप २ व छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशी एकूण ११४ कामे समाविष्ट आहेत.यामध्ये प्रामुख्याने शहरातील विविध प्रभागातील प्रामुख्याने मोठी कामे पुढीप्रमाणे

प्र.क्र.१ मधील (पंचवटीनगर, आशियाना कॉलनी, आयोध्यानगर, लालगुलाब कॉलनी, कजबे मळा, तागड वस्ती, कांदबरीनगरी फेज-1, चिन्मय कॉलनी,) (भिस्तबाग महाल राउंड डी.पी. रस्ता व ओरा टॉवर व नंदनवननगर परिसर),(लेखानगर राजनंदिनी होटल ते तलाठी आफीस त बंधन लॉन्स परिसर)

प्र.क्र.१४ मधील (सारसनगर पुल ते छबु कांडेकर घर ते अरुण गाडळकर घर) 

(बुरुडगाव रोड येथील बालाजी ४१ कॉलनी व परिसर),(नानाजीनगर पुल ते विशाल चिपाडे घर), (वैष्णवीचरण अपार्टमेंट ते अभिषेक चिपाडे किराणा दुकान ते बाळासाहेब एकाडे गिरणी),(नानाजीनगर,ओम कॉलनी परिसरातील गुगळे घर ते पवार घर ते औसरकर घर ते नवनाथ दळवी घर)

प्र.क्र.२,१२,१३,१६ मधील (लक्ष्मीनगर व हिंमतनगर भागात मलनिस्सारण व्यवस्था व रस्ते),(भापकरबाई पुतळा ते सुप्रिम वाईन्स व माळीवाडा वेस भिंगार बँक ते वाडीयापार्क ते टिळक रोड पर्यंत रस्ता),(नेप्ती रोड ते अंबिका शाळा ते पुणे रोड जिल्हा बँक केडगाव)

येथील रस्ते काँक्रिटीकरण / डांबरीकरण / बंद पाईपगटार / पेव्हींग ब्लॉक बसविणे व ओपनस्पेस विकसित करणे कामी आयुक्त यशवंत डांगे यांनी या कामांचा आढावा घेतला. काही कामांची समक्ष पाहणी केली.

प्रस्तावित ११४ कामांपैकी ५० टक्के पूर्ण झाली आहेत. काही अंतिम टप्प्यात असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या तीन महिन्यात मार्च अखेरीपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने कामांचे नियोजन करण्यात आले आहे

काम करताना त्याच्या दर्जाबाबत विशेष लक्ष द्यावे अशा सूचनाही बांधकाम विभागाच्या अधिकारी, अभियंतांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान १५० कोटींच्या निधीतील रस्त्यांची कामेही प्रगतीपथावर असून या कामांनाही गती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.