अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील शेतकरी कुटुंबातील साडेदहा वर्षांच्या मुलीच अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस श्रीगोंदे पोलिसांनी कारवाई करत अवघ्या चोवीस तासाच्या आत अटक केली.
त्याचबरोबर पीडित अल्पवयीन मुलीचीही सुटकाही करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. ९ ऑगस्ट रोजी या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण झाले होते.
नातेवाईकांनी शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्यामुळे मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती.
अपहरण झालेली मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आणि तपासला सुरुवात केली. पोलिसांनी चौकशी केली असता
तालुक्यातीलच एका गावात राहणारा या मुलीचा नातेवाईकाने अपहरण केल्याची माहिती मिळाली. ज्या दिवशी अपहरण झाले त्या दिवशी आरोपी मुलीच्या घरी आल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
हा संदर्भ लक्षात घेत पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी संबंधित संशयित तरुणाचा तांत्रिक बाबीच्या आधारे माहिती घेतली असता हा तरुण बीड जिल्ह्यातील एका गावात असल्याचे समोर आले.
आरोपी व मुलीच्या शोधासाठी पोलिस नाईक मुकेश बडे,प्रकाश दंदाडे,महिला होमगार्ड लष्करे यांच्या पथकाने संशयित आरोपी लपुन बसलेल्या ठिकाणी पोहोचले त्यांना आरोपी व अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी त्याठिकाणी मिळून आली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासातच पोलिसांनी अपहरण झालेली मुलगी व आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले.
पीडित मुलीकडे विचारपूस केली असता तिने अपहरण केलेल्या तरुणाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. या आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved