अहिल्यानगर शहरात विळद घाट येथे एमआयडीसीसाठी 600 एकर जागा निश्चित, शहराची वाटचाल आता मेट्रोसिटीच्या दिशेने;आ.संग्राम जगताप

महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली  व त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी भेटीगाठी सध्या सुरू केलेले आहेत.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News:- संपूर्ण राज्यांमध्ये जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहेच व विधानसभेचे या ठिकाणी 12 मतदारसंघ आहेत.

त्यामुळे राजकारणाच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या जर आपण या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बघितले तर  राज्यात कुठल्याही विधानसभा मतदारसंघांमध्ये नसेल इतके राजकीय वातावरण तापलेले आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.

यामध्ये महायुतीकडून काही उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत तर महाविकास आघाडी कडून देखील काही ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली

व त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी भेटीगाठी सध्या सुरू केलेले आहेत. नुकतेच त्यांनी अहिल्यानगर शहरातील सथा कॉलनीतील नागरिकांशी संवाद साधला व या दरम्यान त्यांनी अहिल्यानगर शहरातील गेल्या दहा वर्षात झालेला विकास आणि आता भविष्यात काही योजना याबाबत प्रतिपादन केले.

 अहिल्यानगर शहराची वाटचाल आता मेट्रोसिटीच्या दिशेने. संग्राम जगताप

अहिल्या नगर शहरातील सथा कॉलनीतील नागरिकांशी आमदार संग्राम जगताप यांनी संवाद व या संवादा दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,अहिल्या नगर शहरातील जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आता मार्गी लागत आहेत.

शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले असून महत्त्वाचे जे काही रस्ते आहेत त्यांचे देखील काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा याकरिता एमआयडिसीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली असून यामुळे आता अहिल्यानगर शहराची वाटचाल मेट्रोसिटीच्या दिशेने होत असल्याचे प्रतिपादन या संवादा दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी केले.

यावेळी शहरातील उद्योजक राजेंद्र चोपडा तसेच माजी नगरसेवक संजय चोपडा, अण्णासाहेब मुनोत, अरविंद गुंदेचा, नरेंद्र लोढा तसेच सुधीर चोपडा, शरद मुनोत इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार जगताप पुढे म्हणाले की, दहा वर्षांमध्ये अहिल्यानगर शहरातील जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते जवळपास मार्गे लागले आहेत.

खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबवून नियोजनबद्ध व कायमस्वरूपी रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम सध्या सुरू आहे. उड्डाणपूला खालील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

शिल्पा गार्डन ते मार्केट यार्ड चौकापर्यंतचे काम सुरू होणार असून शहराच्या प्रगतीसाठी यापुढे देखील काम करायचे आहे. इतकेच नाहीतर विळद घाट येथे सहाशे एकर जागा औद्योगिकीकरणासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प यावेत साठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe