अहमदनगर जिल्ह्यात गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ७ लाख लांबवले

Ahmednagarlive24
Published:
Crime News

Ahmednagar Crime News : अज्ञात चोराने शहरातील तेरा बंगले रस्त्यावरील डॉ. जपे हॉस्पिटल येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाडीची काच फोडून त्यात ड्रायव्हरच्या सीटजवळ बॅगेत ठेवलेली ७ लाख रुपयांची रोख रक्‍कम दोन तासामध्ये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. येवला तालुक्‍यातील अंदरसुल येथे कुटुंबासह राहणारे तक्रारदार कांदा मका व्यापारी ज्ञानेश्‍वर नामदेव पैठणकर (वय ३९)

कोपरगाव येथील जपे हॉस्पिटल या ठिकाणी कोपरगाव येथील घटना मारुती अल्टो या लाल रंगाच्या गाडी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी करून उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेले होते.

उपचार घेतल्यानंतर दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी ते बाहेर आल्यानंतर त्यांना आपल्या गाडीची पुढची काच फुटलेली दिसली व बॅगेतील ५०० रुपयांच्या नोटा असलेल्या सात लाखाची रोख रक्‍कम चोरीला गेल्याचे दिसले.

कांदा मका व्यापारी ज्ञानेश्‍वर नामदेव पैठणकर यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गु. र.नं. ७०/२०२४ नुसार भादवी कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe