Ahilyanagar News:- केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी अनेक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून अशा घटकातील व्यक्तींना व्यवसाय उभारता यावा व त्यांचे आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारच्या या योजना खूप महत्त्वाच्या आहेत.
अगदी याच पद्धतीने देशातील गरीब असलेल्या कारागिरांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून काही दिवसांपासून पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या योजनेत आतापर्यंत 78 हजार 213 कामगारांनी नोंदणी केली असून अशा ग्रामीण व शहरी कारागिरांना व्यवसायासाठी या योजनेतून शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.

जिल्ह्यातील 78 हजारपेक्षा जास्त कारागिरांची या योजनेत नोंदणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गरीब कारागिरांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली असून या योजनेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 78 हजार 213 कामगारांनी नोंदणी केली आहे.
या योजनेत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल व या प्रशिक्षण कालावधी दरम्यान त्यांना प्रति दिवस पाचशे रुपयांचा भत्ता देखील दिला जाणार आहे.जेव्हा या कारागिरांचे प्रशिक्षण पूर्ण होईल तेव्हा त्यांना टूलकिट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये देखील दिले जातात.
इतकेचं नाही तर स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत एक ते तीन लाख रुपयापर्यंत कर्ज कुठल्याही हमीशिवाय दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
त्यानंतर अर्जदारांची त्रिस्तरीय पडताळणी केली जाते व नंतर योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण भागामध्ये या योजनेतील अर्जदारांच्या पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आहे. तर शहरी भागांमध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकांकडे पडताळणी होणार आहे.
या योजनेत कोण असेल पात्र?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरिता व्यक्ती १८ क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे व या 18 मध्ये सुतार तसेच बोट किंवा नाव बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे कारागीर, सोनार तसेच कुंभार, शिल्पकार, मिस्त्री, मच्छीमार, टूलकिट निर्माता, दगड फोडणारे मजूर, मोची कारागीर, टोपली,चटई,झाडू बनवणारे, बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक,
न्हावी तसेच हार बनवणारे, धोबी आणि शिंपी हे कारागीर पात्र असणार आहेत. तसेच अर्जदार हा भारतीय नागरिक असावा व त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे. तसेच अर्जदाराकडे मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी लागतात ही कागदपत्रे
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे आधार आणि पॅन कार्ड, उत्पन्नाचा प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र, ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो व बँकेचे पासबुक तसेच वैध मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे.
आचारसंहितेमुळे सध्या योजना बंद
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असल्यामुळे पूर्ण राज्यात आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या थेट लाभाच्या योजना बंद आहेत व त्यात या योजनेची देखील नोंदणी बंद करण्यात आलेली आहे. परंतु जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा मात्र या योजनेची प्रक्रिया पून्हा सुरू होणार आहे.