बालकांच्या जीवावर उठलेला ‘त्या’ बिबट्याच्या शोधासाठी 80 अधिकारी, विशेष नेमबाज, दोन ड्रोन व 25 ट्रॅक कॅमेरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले.

यामुळे ग्रामीण भागात मोठी दहशत पसरलीआहे. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी आता राज्यभरातील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबाजांना पाथर्डी तालुक्यात पाचारण करण्यात आले आहे.

तालुक्यातील डोंंगराळ, निर्जन ठिकाणं आणि गर्भगिरी डोंगराच्या भागातून बिबट्याचा माग काढण्यात येत असून वन विभागाचे तब्बल 80 अधिकारी-कर्मचार्‍यांसह बिबट्याला शोधण्यासाठी दोन ड्रोनसह पंचवीस ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले आहेत.

सिन्नर, जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि बीड येथील पथके दाखल झाले असून त्यांनी त्या नरभक्षक बिबट्याची शोध मोहिम हाती घेतली आहे.

सर्च लाईट, नाईट मोड कॅमेरे, खोल दरीत उतरण्यासाठी अत्याधुनिक ट्युब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे रेस्क्यु व्हॅन्स, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे,

लाठया काठ्या, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्टी, वॉकी टॉकी सेट अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साधन सामुग्रीसह शहरातील हंडाळवाडीपासून वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगर रांगाचा निर्जन प्रदेश या भागामध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत.

तालुक्यात ठिकठिकाणी 18 पिंजरे लावण्यात आले असून आवश्यकतेनुसार पिंजर्‍याची संख्या वाढविण्यासाठी इतर जिल्ह्यातून पिंजरे मागविण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment