पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 9 जणांना अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोना नियमांचे उल्लंघन करत असलेल्या टोळीला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना संगमनेर शहरात तीन बत्ती येथे घडली होती.

आता या प्रकरणात समावेश असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या सर्वाना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत शहरात विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले असून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी अगोदर चार जणांना पोलिसांनी अटक केलेली होती. याप्रकरणी सहा निष्पन्न सह १० ते १५ जणांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक करण्यात आलेले संशयित रिजवान मोहम्मद खान चौधरी (वय ३१, अपनानगर, संगमनेर ), इर्शाद अब्दुल जमीर ( वय ३७ रा. भारतनगर ),

सय्यद जोयेबअली शौकत सय्यद (वय २७ रा. तीन बत्ती चौक), अर्शद जावेद कुरेशी (वय १८ रा. लखामीपुरा),

मोहम्मद मुस्ताक फारूक कुरेशी (वय ३५ रा. मोगलपुरा), शफिक इजाज शेख (वय ३५ रा. लखमीपुरा), युनुस नूर मोहम्मद शेख (वय ३१ सय्यदबाबा चौक),

फारूक बुर्हाण शेख (वय ४५ मोगलपुरा), अरबाज आजीम बेपारी (वय २० भारतनगर) अशी अटक केलेल्या ९ जणांची नावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News