सराफाकडून महिलेची 9 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला एका सराफाने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पोलिसांनी या प्रकरणी एक़ास ताब्यात घेतले असून एक जण पसार झाला आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, येथील वैष्णवी अलंकार गृहाने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे ज्वेल गोल्डी योजनेचे आमिष दाखवून सोने जमा करून एका तोळ्यामागे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्याचे सांगितले.

त्यामुळे फसव्या योजनेत 29 तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली. प्रारंभी काही दिवस योजनेचा लाभ मिळत गेला. पुढे करोनाने संबंधित सराफाचे दुकान बंद पडल्याने योजनेचा लाभ न देता थेट लाभाच्या रक्कमेचे वाढीव सोने देणार असल्याचे सांगितले.

परंतु अशा फसव्या योजनेत सुमारे 9 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक झाली असून कोकमठाण येथे वैष्णवी अलंकार गृहाच्या सोने ठेवा पैसे मिळवा योजनेत चार वर्षांपूर्वी सहभाग घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोकमठाण येथील योगीता पवार हिने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बाळासाहेब डहाळे,

अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी बाळासाहेब डहाळे यांना ताब्यात घेतले असून त्यांचा मुलगा पसार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment