Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील एका मोठ्या पुढाऱ्यावर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तो पुढारी एका पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. त्या पुढाऱ्यावर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुले सध्या कार्यकर्त्यांत देखील खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी : राहुरी कॉलेज समोर रस्त्यावर लावलेली गाडी बाजूला घ्या म्हटल्याचा राग आल्याने तिघा जणांनी नाशिक येथील एकाला बेदम मारहाण केली. निलेश जनार्दन भोसले (वय-३४, धंदा खासगी नोकरी, रा. नाशिक) असे मारहाण झाल्याचे नाव आहे. त्याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. निलेश भोसले हे दि. २४ जानेवारीला आपल्या सेल्टॉस गाडीने नगरहून नाशिककडे चालले होते.

नगरमधून ते पुढे गेल्यावर एका तालुक्यातील एका हॉटेल पुढे रोडवर एक स्विफ्ट गाडी उभी होती. त्यामुळे त्यावरील चालकाला भोसले यांनी तुमची गाडी बाजूला घ्या, असे म्हटल्याने त्याचा त्याला राग आला. त्यावेळी हॉटेलमधून एक इसम भोसलेंकडे आला व तुमची गाडी बाजूला घ्या, असे म्हणाला. तेव्हा भोसले यांनी गाडी बाजूला घेतली. तेव्हा सदर इसम परत आला व म्हणाला की, गाडीतून खाली या असे म्हटले.
पुढे भोसले याने म्हटले आहे की, मी गाडीतून खाली उतरलो त्याचवेळी स्विफ्ट गाडीतील दोन व्यक्तींनी आपल्याला शिवीगाळ, मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी एक इसम लाकडी काठी घेवून आला व त्याने आपल्या डोक्यात, पाठीवर काठीने मारहाण केली. यावेळी एकाने आपल्या गळयातील दोन तोळयाची एक लाखाची सोन्याची चैन तोडून ओढून घेतली.
निलेश भोसले या प्रकरणानंतर पोलिसात तक्रार द्यायला गेले. तेव्हा त्या ठिकाणी हे तिघे पोलीस स्टेशनला आहे. तेव्हा भोसले यांना त्यांची नावे कळाली. याप्रकरणी भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यात त्या पुढाऱ्याचाही समावेश होता. त्या पुढाऱ्याला अटक करण्यात आली व सुटकाही करतण्यात आली अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.