अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपचारांचे बिल भरण्याच्या वादातून जमावाने गुंजाळवाडीतील संजीवन हॉस्पिटलची तोडफोड करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी रात्री ९ वाजता घडला होता. या संदर्भात शहर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, संजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला.
त्या रुग्णाची सर्व माहिती देत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बिल भरण्यास सांगितले. रुग्णाचा कृत्रिम श्वास यंत्र (व्हेंटिलेटर) बंद का केले, असा सवाल करुन नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करण्यास सुरुवात केली. डॉ. स्वप्निल भालके व डॉ. जगदीश वाबळे यांना मारहाण करण्यात आली.
या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. डॉ. स्वप्निल नेताजी भालके व समीरलाल शेख यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved