अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीची धामधूम सुरु असताना नगरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांमध्ये मोठी घाबरट पसरली आहे.
दरम्यान नगरच्या बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून शंभर रुपयांच्या व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आलेल्या आहेत,
दोन दिवसांपूर्वी येथील एका व्यापार्याला वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने शंभर रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे या व्यापाऱ्याच्या लक्षात आले.
या अगोदर नगर शहरामध्ये मागील महिन्यामध्ये पाचशे रूपयांच्या बनावट नोटा बाजारामध्ये आल्या होत्या. दसऱ्याच्या दरम्यानही अशा बनावट नोटांचे पेव फुटले होते, त्यामुळे पोलिसांनी बनावट नोटांचा तपास करावा, अशी मागणी आता व्यापारी वर्गातून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved