सराईत गुन्हेगारांची टोळी दीड वर्षांकरीता जिल्ह्यातून हद्दपार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेसाठी, टोळीची दहशत कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी टोळी प्रमुख मनोज डोंगरे याच्यासह चौघांना दीड वर्षांकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

राहुरी पोलीस ठाण्याने पाठविलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निर्णय घेत ही कारवाई केली आहे.

यामुळे जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. संघटीतपणे टोळी तयार करून हत्याराचा वापर करत लोकांना धमकावणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा,

दरोड्याची तयारी, बळजबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मनोज डोंगरे व त्याच्या टोळीतील सदस्यांना जिल्ह्यातून 2 वर्षांकरीता हद्दपार करण्याचा प्रस्ताव राहुरी पोलिसांनी 27 जुलै 2020 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठविला होता.

त्यानुसार हि कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये टोळीचा प्रमुख मनोज गोरक्षनाथ डोंगरे (वय 26), स्वप्नील रमेश बोरूडे (वय 27), आबासाहेब बाळासाहेब वरखेडे (वय 34), आदेश ऊर्फ आदिनाथ रवींद्र जाधव (वय 23 सर्व रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) असे हद्दपार केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!