Ahmednagar News : मूळ राहणार मुंबई येथील मात्र कामासाठी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आलेले सोन्याचे व्यापारी दिपेश जैन हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोन्याचे व्यापारी दिपेश जैन गेल्या अनेक वर्षापासुन पाथर्डीत येत होते. येथील दुकानदारांना सोने देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन ते मुंबईला जात असत.
याच कामासाठी ते आले होते. येथील एका खाजगी लाँजवर जैन मंगळवारी मुक्कामी होते. दिवसभर पाथर्डीत सोन्याच्या दुकानदारांच्या भेटी जैन यांनी घेतल्या आहेत.
बुधवारी सायंकाळी जैन यांचे त्यांच्या घरच्या लोकासोबत बोलने झाले होते. परत रात्री नातेवाईकांनी जैन यांना फोनवर सपंर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
म्हणुन लाँज चालकांना फोन करुन विचारले असता त्यांच्या रुमला बाहेरुन कुलुप होते. मात्र त्यांचा मोबाईल रुममधे होता.
याबाबत माहिती मिळताच जैन यांची नातेवाईक रात्री प्रवास करुन पाथर्डीत दाखल झाले त्यांनी पाथर्डी पोलिसात दिपेश जैन गायब झाल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान जैन अचानक गायब झाले.
त्यांचा फोनही रुमवरच राहीला. त्यांच्याकडे नेमके किती पैसे होते. गायब होण्याचे कारण काय असेल.
ते स्वतः गायब झाले की पैशासाठी त्यांना कोणी गायब केले का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.