परजिल्ह्यातून मजुरी काम करण्यासाठी आलेल्या मजुराची गळफास घेत आत्महत्या

Published on -

परजिल्ह्यातून मजुरी काम करण्यासाठी नगर तालुक्यातील अकोळनेर येथे आलेल्या मजुराने पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.९) सकाळी घडली.

मधुकर गणपत डोंगरे (वय ५४, रा. गौखेडा, यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. तो अकोळनेर येथील अक्षय रामदास मेहेत्रे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेड मध्ये राहात होता.

मधुकर डोंगरे याने मंगळवारी (दि.९) सकाळी पर्त्याच्या शेड मध्ये गळफास घेतला. सदरची घटना लक्षात आल्यानंतर मेहेत्रे यांनी त्यास उपचारासाठी सकाळी १०.४० वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. तशी खबर वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जठार यांना दिली.

अंमलदार जठार यांनी दिलेल्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या माजुरने हे टोकाचे पाऊल का उचलले असेल याबाबत परिसरात सध्या चर्चा सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!