अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यात दुचाकीवरून घरी जाणाऱ्या सराला येथील विजय नारायण विटेकर (वय २७) याच्यावर बिबट्याने झेप घेतली. सुदैवाने तो बचावला.
त्याच्या हाताला व पाठीला बिबट्याचे दात लागल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माळेवाडी-सराला रस्त्यावर रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सराला-गोवर्धन, निमगाव खैरी, जाफराबाद, नाऊर शिंदे वस्ती आदी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्यात गोवर्धन येथील शेतकरी सोमनाथ जगताप यांच्या कालवडीचा बळी बिबट्याने घेतला होता.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved