विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला मिळाले जीवदान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे दहशत वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन नागरिकांना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान बिबट्याने अनेक मानवीवस्तीवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अजूनच चिंता वाढली आहे.

नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील जवाहरवाडी शिवारातील बहौदिन इनामदार यांच्या विहिरीत एक बिबट्याचा बछडा पडला असल्याची घटना घडली होती.

या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले. वनपाल भाऊसाहेब गाडे, सूर्यकांत लांडे, बी. एस. सुराशे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेटला दोरी बांधून बछडा बाहेर काढला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment