अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील भटक्या आदिवासी समाजातील पदवीधर असलेल्या सोन्याबापू गरमलाल भोसले या तरुणाला जिल्हा उद्योग केंद्रात बीजभांडवल योजनेत १९ सप्टेंबर २०१९ मध्ये तीन लाख रुपये गाई खरेदीसाठी मंजूर झाले.
याबाबत घारगाव येथील सेंट्रल बँकेत कर्ज मंजुरी आणि कर्ज देण्यास पत्र दिले. मात्र तब्बल दहा माहिने पूर्ण झाले तरी बँक या आदिवासी तरुणाला कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत.
श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील आदिवासी पारधी समाजातील तरुण सोन्याबापू भोसले हा पदवीधर तरुण असून त्याने व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे दिला होता.
त्यानुसार भोसले याला तीन लाख रुपये कर्ज ही मंजूर झाले. याबाबत घारगाव येथील सेंट्रल बँकेत हे तीन लाख रुपये कर्ज देण्याबाबत पत्र देण्यात आले. तरुणाला बँकेत गेल्यावर कर्ज देण्यात टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा