श्रीगोंदा :- दोन मालमोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता मढेवडगाव येथे घडली.
नगर-दौंड रस्त्यावर बसस्थानकाशेजारी गव्हाचे पोते भरलेली मालमोटार (आरजे ०९ जीडी १६१९) उभी होती. गाडीला रिफ्लेक्टर नसल्याने पाठीमागून आलेल्या बटाटा भरलेल्या मालमोटाराची (आरजे ११ जीए ६१७०) तिला जोरदार धडक बसली.

या अपघातात क्लीनर रामलखन प्रीतमसिंह बघेल(वय २४, पिपुरवा, जि. ढोलपूर, राजस्थान) हा जागीच ठार झाला, तर चालक अमित मिश्रा (वय ३२) जखमी झाला.
दोन्ही गाड्यांतील गहू व बटाट्याचे मोठे नुकसान झाले. दोन्ही गाड्या राजस्थान येथील होत्या. पहाटे अपघात झाल्याने वेळेवर मदत पोहोचू शकली नाही.
गावकऱ्यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
अपघातग्रस्त गाडी रस्त्यावरच असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.पोलिसांनी क्रेन आणून गाडी बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत चालू झाली.
- 6000mAh बॅटरी, 16GB रॅम आणि 50MP कॅमेरा ! Realme वॉटरप्रूफ स्मार्टफोन 12 हजारांत
- 248KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर ! Simple One ने बाजारात धुमाकूळ घातला
- Samsung Galaxy A25 आता स्वस्तात ! 8GB रॅम, 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला फोन 8,599…
- Samsung Galaxy S25 Edge चा कॅमेरा DSLR लाही हरवणार ? स्मार्टफोनच्या दुनियेत नवा राजा!
- भारतातील पहिली CNG स्कूटर येतेय – किंमत आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल TVS Jupiter CNG