या तालुक्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या बैठक होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी (ता. 25) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार आहे.

राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांची विधानसभेवर निवड होऊन, राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे, रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे, अनिता दशरथ पोपळघट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला आहे.

आता केवळ पोपळघट यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. कासार यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविले आहे.

त्यामुळे जनसेवा मंडळाचे पक्षश्रेष्ठी माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पालिकेतील गटनेत्या डॉ. उषा तनपुरे

यांच्या चर्चेनंतर दिलेल्या आदेशानुसार कासार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान उद्या पोपळघट यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment