अहमदनगर शहरात नवीन व्यवसाय परवाना शुल्क कर लागू करू नये

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या आस्थापनांना २०० रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत वार्षिक शुल्काचा दर प्रस्तावित करण्यात आला असून महानगरपालिका लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहे.

सदर नवीन करास व्यापाऱ्यांचा विरोध असून त्याचा विपरित परिणाम व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे नवीन कर लावण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये अशी मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती मिनाताई चोपडा यांनी केली आहे.

महापालिका हद्दीतील व्यावसायिक, आस्थापनांना व्यवसाय परवाना कर लावण्याच्या हालचाली सुरु आहेत. महापालिका प्रशासन लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुळात सर्व व्यावसायिक हे केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाचे सर्व कर भरून महानगरपालिकेचही सर्व कर भरतात.

इन्कम टॅक्स, जीएसटी भरण्यात येतो. व्यापारी हे बँकांचे व्याज, सेवकांचे पगार सांभाळून आपला उदरनिर्वाह करतात. ऑनलाईन व्यापारामुळे स्थानिक व्यापारावर परिणाम झालेला आहे.

आता व्यवसायिक परवाना करामुळे व्यापाराला आणखी विपरित परिणाम होणार आहे. हा कर पूर्णतः जाचक असून व्यापाऱ्यांना त्रास देणारा आहे. या नव्या करास माझा विरोध असून त्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe