Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा (शिर्डी) येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे खासदार डॉ. सुजय विखे पा. व आ. बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते संदीप नागवडे, भगवान पाचपुते, आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, कृषी अधिकारी दीपक सुपेकर उपस्थित होते.
बैठकीत डॉ. सुजय विखे म्हणाले की, निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण, विमानतळ इमारतीचे भूमीपूजन, साईसंस्थानच्या दर्शन कॉम्पेल्क्सचे उद्घाटन, असे कार्यक्रम मोदींच्या उपस्थित होणार असून, या कार्यक्रमास केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेत, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
श्रीगोंदा तालुक्यातील हजारो नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला असून, या सर्व लाभार्थ्यांनी पंतप्रधानांचा हा दौरा व्यवस्थितपणे पार पडावा, या उद्देशाने कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत, महिला बचतगट, अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कार्यक्रमास आणण्याची जबाबदारी कार्यकर्ते ‘व पदाधिकाऱ्यांनी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना बैठकीत खा. सुजय विखे यांनी केल्या.
बैठकीस अशोक खंडके, बापूसाहेब गोरे, मिलींद दरेकर, अजित जामदार, सुनील वाळके, अॅड. महेश दरेकर, सुवर्णा पाचपुते, दादाराम ठवाळ, श्रीगोंदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.