पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले दुकान फोडून पावणेदोन लाखांचा माल लंपास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पैठण रस्त्यावरील कृषी सेवा केंद्राचे पत्रे उसकटून चोरट्यांनी बुधवारी तब्बल १ लाख ७१ हजार किमतीच्या मालावर डल्ला मारला.

पोलिसांना आव्हान देत आठ दिवसांत दुसऱ्यांदा शहरातील दोन दुकानांतून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, तसेच साहित्यावर डल्ला मारला.

ज्ञानेश्वर भाऊसाहेब मोरे (खुंटेफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुभम अँग्रो एजन्सीच्या मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून केबल, अाॅटोमॅटिक स्टार्टर, लॅपटाॅप, प्रिंटर, पॅच असे साहित्य लांबवले.

याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच, २३ अाॅक्टोबरला शुभम ॲग्रोशेजारी असलेल्या समर्थ किराणा स्टोअर्स या दुकानातही चोरट्यांनी हात साफ केला होता.

पाच लाख रुपयांचे किराणा सामान व ताडपत्र्या चोरण्यात आल्या. एवढ्या मोठ्या रकमेची चोरी होऊनही पोलिसांनी संबंधित दुकानदाराची फिर्याद नोंदवून घेण्यास तब्बल आठ दिवस विलंब लावला.

ज्ञानेश्वर दत्तू शेळके यांच्या फिर्यादीवरून ३० आॅक्टोबरला केवळ ८७ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानांत एकाच पध्दतीने चोरी करून चोरट्यांनी धाडस दाखवले.

चोऱ्या थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी फिर्याद घेऊन गेलेल्या दुकानमालकांनाच पोलिस वेठीस धरतात. दिवाळी जवळ आल्याने व्यापाऱ्यांनी दुकानांत माल भरला आहे. रेकी करून चोरटे माल लांबवत आहेत. चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment