श्रीक्षेत्र मढी येथे लवकरच अत्याधुनिक सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-भटक्यांची पंढरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे लवकरच सर्व भाविकांसाठी वाढीवचे प्रसादालय भक्त निवास, स्वच्छतागृह या नेहमीच्या सेवा सुविधेसह भक्तांसाठी व सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस आहे.

लवकरच सर्वांच्या सहकार्याने तो पूर्ण करू, असे प्रतिपादन देवस्थानचे नूतन विश्वस्त रवींद्र आरोळे यांनी केले. मढी देवस्थानच्या विश्वस्तपदी रवींद्र आरोळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रवीण राजगुरू मित्र मंडळाच्या वतीने आंबेडकर भवन येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रवीण राजगुरू, दिगंबर गाडे, नितीन गटाणी, विनोद थोरात, संजय काटे, नितीन दिनकर, भास्कर दोडके, दादा मोहिते, राहुल सरसे, दीपक आव्हाड आदी उपस्थित होते. आरोळे म्हणाले, तालुका व परिसराच्या दृष्टीने सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त रुग्णालयाची नितांत गरज आहे.

अनेक सर्वसामान्य भाविक असतील अथवा नागरिक असतील त्यांना अनेकदा उपचाराचा खर्च पेलवत नाही. त्यामुळे अनेकदा अपूर्ण उपचार घ्यावे लागतात. अनेकदा अर्धवट उपचार घेऊनच रुग्णाला घरी जावे लागते.

अशा घटना होऊ नये, यासाठी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, अध्यक्ष संजय मरकड, तसेच सर्व विश्वस्त व ग्रामस्थांच्या सहकार्यातून लवकरच रुग्णालय उभारण्याचा मानस पूर्ण करू. यासह भाविकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी विश्वस्त मंडळ नेहमी कार्यरत राहील, असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment