Ahmednagar News : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात.
याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी दुर्गाष्टमी व कालाष्टमी असे सण-उत्सव आहेत. तसेच श्रावणातील मंगळवारी मंगळागौर ही साजरी करण्यात येणार आहे.
महादेवाला अतिप्रिय असणारा महिना हा श्रावण मानला गेला आहे. या महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. तसेच दर सोमवारी शंकराचा अभिषेक, पूजा केली जाते. मात्र यंदाच्या श्रावण महिन्यात दुर्मिळ संयोग जुळून आला आहे.
तसे महादेवाची आराधना भाविक वर्षभर करत असतात. मात्र श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाचा विशेष अभिषेक, पूजा केलेल्या विशेष फळ मिळते असे मानले जात असल्याने या महिन्यातील सोमवारी केलेल्या पूजेला विशेष महत्व आहे. यंदा दुर्मीळ योग आला असून श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे.
यंदा श्रावणाला सोमवारी दि.५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तर सांगता २ सप्टेंबरला होणार आहे. ३ सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा अतिशय दुर्मीळ योग आहे.
यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५ श्रावणी सोमवार असणार आहेत. यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. यंदा श्रावण महिन्यात शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, नवपंचम योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत. या शिवाय कुबेर योग आणि षष्ठ योगही तयार होत असल्याने या महिन्याचे महत्व अधीकच वाढले आहे.