अण्णांचा एक इशारा…नेते मंडळी थेट अण्णांच्या दारात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता.

अण्णांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज भाजपाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली.

अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली. अण्णांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल.

अण्णांचे वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबून नये असा आग्रह भाजपा नेत्यांनी अण्णांना केला. पण दोन वर्षात या आश्वासनाचे पालन झाले नसल्याची आठवण यावेळी अण्णांनी भाजपा नेत्यांना करून दिली.

सरकारने दिलेले लेखी आश्वासन हे वचन आहे. मात्र दिलेल्या वचनाचे पालन होत नसल्याने अशा राज्यात आता जगण्याची इच्छा राहिली नाही असा उद्विग्न इशाराही हजारे यांनी दिला.

आमदार बागडे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी यावेळी अण्णांना सुधारित कृषी कायद्याची मराठी आवृत्ती दिली. हे कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे असून लवकरच देशातील शेतकर्‍यांचे हित झाल्याचे पहायला मिळेल असे भाजप नेत्यांनी सांगीतले.

तसेच या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी विनंती भाजपा नेत्यांनी हजारे यांना केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment