Ahmednagar News : शेतात काम करणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या तीन आनोळखी इसमांनी कोकरु घ्यायचे आहे का. अशी विचाराणा करत त्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले ओरबाडून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव रस्त्यावरील औटेवस्ती परिसरात भरदिवसा घडली.
याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संगीता औटी यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी औटी या गुरुवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शेतातील गवत काढत होत्या.यावेळी तेथे काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायलवरून अनोळखी तिघेजण आले. त्यांच्या हातात असलेले कोकरू तुम्हाला घ्यायचे का अशी औटी यांना विचारणा केली.
त्यावर फिर्यादी महिलेने नकार देताच त्यातील एकाने गाडीवरून उतरत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडत फिर्यादी महिलेला शेतात ढकलुन दिले. झटापटीत महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे सोन्याचे डोरले ओरबाडून नेत चोरट्यांनी दुचाकीवरून आढळगावकडे पसार झाले.
या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संगीता औटी यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे या भागात चांगलीच खळबळ उडाली आहे.