अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- बुधवारी रात्री अज्ञात वाहनाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना संगमनेर शहरातील रहाणेमळा येथे घडली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.17) सकाळी ही घटना निदर्शनास आली.
याबाबतची समजलेली माहिती अशी की, रहाणेमळा येथे अज्ञात प्रवासी वाहन बुधवारी रात्रीच्या सुमारास आले होते. त्यावेळी अंधारामध्ये संतोष उर्फ दगडू श्रीरंग शेळके (वय 35) हा तरुण न दिसल्याने वाहनाखाली चिरडला गेला.
तत्पूर्वी मयत तरुण बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून दारुच्या नशेत असल्याने घटनास्थळी पडून असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, घटनास्थळी पोलिसांनी भेट देत पाहणी करुन पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात हलविला आहे. तर पुढील तपास सीसीटीव्हीच्या आधारावरुन सुरू केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये