१५ जानेवारी २०२५ नगर : लग्नाचे आमिष दाखवून व मारहाण, दमदाटी करत युवतीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्या तरूणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिराज शेख (रा. घाटनांदुर अंबेजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.पीडित युवतीने सिराजवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.फिर्यादी मुळच्या भोर (जि. पुणे) तालुक्यातील रहिवाशी असून सध्या अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहेत.

सिराज शेख याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून खडकी खंडाळा येथील लॉजवर तसेच त्यांच्या घरी शारीरिक संबंध ठेवले.पीडिताने नकार देऊनही सिराजने तिला धमकावून व मारहाण करून संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, सदरची घटना १४ जुलै २०२४ रोजी घडली असून पीडित युवतीने सदरचा प्रकार ११ जानेवारीला नगर तालुका पोलिसांना सांगितला.पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करत आहेत.