अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा शिरकावं ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात झाल्याने चिंता वाढली आहे.
राहाता तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या गावात तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह आदळले आहेत.
आरोग्यसेवक पैठणे यांनी सिद्धार्थ नगरमधील दहा जणांचे अँटीजेन रॅपिड करोना टेस्ट केली असता त्यापैकी तीन जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.
तसेच तेथील एका सिस्टरलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. काल राहाता बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संतोष आगलावे,
ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर जपे, ग्रामपंचायत कर्मचारी नाना पवार यांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन जंतूनाशक फवारणी केली. यात ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर जपे यांनी विनामोबदला स्वमालकीचा एसटीपीसह ट्रॅक्टर पुरवला आहे.
ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे जातीने ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून असून नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.
परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved