अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरच्या उत्तर भागात बिबट्यांची दहशत ही नित्याचीच झालीये. या दहशतीखालीच येथील लोकांचा वावर असतो. संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील शेतकरी बिबटयाच्या दहशतीने धास्तावलेलेच आहेत.
परंतु आता या गावांमध्ये आता मोठ्या संख्येने विषारी नाग आढळून येत असल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.

हे विषारी नाग थेट वर्दळीची ठिकाणे असलेल्या घरांमध्ये आढळून येत असल्याने नागरीकांमध्ये भिती वाढली आहे. त्यामुळे या विषारी नागापासून बचाव व्हावा यासाठी वनविभागाने या परिसरात विशेष मोहीम राबवून नागरिकांना धिर देऊन
उपाय योजनाबाबत प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी जमीनीत खोलवर झिरपल्याने जीव वाचवण्यासाठी जमीनीखालील अधिवास सोडून
विषारी नाग व इतर सरपटणारे प्राणी बाहेर आले आहेत. तर या वर्षी झालेल्या वातावरणातील बदलामुळे दुर्मिळ विषारी सर्पाची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच बेडूक व उंदीर हे नागाचे आवडते खाद्य असल्याने खाद्याच्या शोधात ते परिसरातील घरांमध्ये घुसत आहेत.
अबब ! ह्या व्यक्तीने इतके पकडले साप :- स्थानिक सर्पमित्र शिवा पवार यांनी मागील दोन महिन्यात लहान मोठे 50 ते 55 विषारी नाग, 4 मणियार आदीसह धामण, कवड्या, तस्कर असे बिनविषारी सर्प पकडून निसर्गात मुक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved