अबब! ‘ह्या’ गावांत आधी बिबट्या आता नागासह इतर विषारी सापांची दहशत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगरच्या उत्तर भागात बिबट्यांची दहशत ही नित्याचीच झालीये. या दहशतीखालीच येथील लोकांचा वावर असतो. संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील शेतकरी बिबटयाच्या दहशतीने धास्तावलेलेच आहेत.

परंतु आता या गावांमध्ये आता मोठ्या संख्येने विषारी नाग आढळून येत असल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. इतर विषारी संर्प व हिंस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. अद्याप कोणीही या प्राण्यांच्या हल्ल्यांना बळी पडले नसले तरी वारंवार होणार्‍या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

आश्वी खुर्द येथील डॉ. प्रणव गुणे यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी इंडियन ब्लॅक कोब्रा या अति विषारी नागाने भक्षाच्या शोधात हजेरी लावली होती. या कुटुंबाने या विषारी नागाला मारण्याऐवजी येथील सर्पमित्र शिवा पवार याला फोनवरून याबाबत माहिती दिली.

क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र शिवा पवार याने डॉ. गुणे यांच्या घरी धाव घेऊन मोठ्या शिताफीने या विषारी नागाला बंदिस्त करून लांब निसर्गात मुक्त केले. दैनंदिन परिसरातील वेगवेगळ्या गावांमध्ये लहान मोठ्या सर्पांबरोबरच इतर विषारी सर्प आढळून येत असून यामुळे अद्याप कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसली

तरी या विषारी प्राण्याच्या दर्शनाने धडकी भरत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. तर मागील काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले कमी झाल्यामुळे दिलासा मिळालेल्या शेडगाव, हंगेवाडी, पानोडी, शिबलापूर व माळेवाडी परिसरातील 12 ते 15 नागरिकांना मागील आठवड्यात सरसाने हल्ला करून जखमी केल्याची

घटना ताजी असताना वाढत चाललेल्या या विषारी नागाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी जमीनीत खोलवर झिरपल्याने जीव वाचवण्यासाठी जमीनीखालील अधिवास सोडून विषारी नाग व इतर सरपटणारे प्राणी बाहेर आले आहेत.

तर या वर्षी झालेल्या वातावरणातील बदलामुळे दुर्मिळ विषारी सर्पाची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच बेडूक व उंदीर हे नागाचे आवडते खाद्य असल्याने खाद्याच्या शोधात ते परिसरातील घरांमध्ये घुसत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment