अबब! कांदा तेजीत ; जाणून घ्या दर

Published on -

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- कांदा चांगलाच तेजीत आला असून, नगर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी झालेल्या लिलावात गावरान कांद्याला आतापर्यंत उच्चांकी सात हजार रुपयांचा भाव मिळाला.

अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये एक नंबरच्या कांद्याला साडेसहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

तर दोन वक्कलांना 8 हजार रुपये भाव मिळाला. गावरान कांद्यास 1 नंबर 6 हजार 100 ते 7 हजार, 2 नंबर 3 हजार 600 ते 6 हजार 100, 3 नंबर 1 हजार 500 ते 3 हजार 500 आणि 4 नंबर 500 ते 1 हजार 500रुपये प्रती क्विटंल असा दर मिळत आहे.

महिनाभरापासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गावरान कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मागील महिन्यांत नगरच्या बाजार समितीत गावरान कांद्याला 5 हजार रुपयांचा भाव मिळाला होता.

त्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा कांद्याचे भाव वाढले. तर गुरुवारच्या लिलावात 6 हजार 500 रुपयांपर्यंत क्विंटलपर्यंत कांदा दर वाढले होते.

काल झालेल्या लिलावात गावरान कांद्याची 17 हजार 852 क्विंटल, तर लाल कांद्याची 800 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याचे भाव 4 हजार 800 पर्यंत गेले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News