छत्रपती संभाजी नगर महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात

Published on -

Ahilyanagar News : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर इमामपूर परिसरात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठ्या स्वरुपाचे अपघात घडत घडत आहेत. परिसरातील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी गणेश आवारे यांच्यासह इमामपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. अपघातात अनेक निष्पापांचे बळी जात आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व येत आहे.

त्यातच इमामपूर येथील बहिरोबा मळा परिसरात महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकाच्या खड्डे लक्षात येत नाहीत त्यामुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्न करत दुचाकी चालक रस्त्यावर पडून जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत.

तरी सदर खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच महामार्गावर इतर ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. इमामपूर येथील बहिरोबा वस्तीवरील खड्डे दुरुस्ती करण्याची मागणी गणेश आवारे यांच्यासह इमामपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. तात्काळ खड्डे बुजविण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तसेच छत्रपती संभाजी नगर महामार्गावर अनेक ठिकाणे अपघातासाठी रेड झोन ठरलेले आहेत. गजराज नगर चौक, धनगरवाडी, शेंडी बायपास, जेऊर मुख्य चौक, महावितरण कंपनी चौक, लीगडे वस्ती, बहिरोबा मळा या ठिकाणी रिफ्लेक्टर सिग्नल लाईट, झेब्रा क्रॉसिंग पट्टे तसेच अपघात टाळण्यासाठी इतर उपाययोजना करण्याची देखील मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe