अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ कोपरगाव : शहरातील एका तरुणाने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना कोपरगावमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.अविनाश नारायण पंडोरे (वय २८, रा. मोहिनीराजनगर, कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी कोपरगावात आई व आजीसोबत राहत असून, ती इयत्ता नववीत शिक्षण घेते. आरोपीने मुलीला मोबाइल दिला.
तीस व तिच्या आजीला जिवे मारण्याची धमकी देवून वारंवार तिच्या घरी येवून तिच्या इच्छेविरुद्ध दि. २२ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेदरम्यान तसेच दि. ३, ८ व दि. १५ जानेवारीला सदर मुलीवर आरोपीने अत्याचार केला. दरम्यान, मुलीचा वारंवार मोबाइलवर बोलण्याचा संशय आल्याने शाळेच्या शिक्षिकेने त्याची चौकशी करून तिचा मोबाइल ताब्यात घेतला.
तेव्हा मोबाइलवर असलेले मेसेज वाचून शिक्षिकेने मुलीच्या आईला बोलावून घेतले. त्यांना सदरचे मेसेज दाखविले. मुलीस मेसेजबाबत विचारले असता तिने घडलेली घटना सांगितली.
याप्रकरणी पीडित मुलीने आरोपीविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.