बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारा आरोपी अटकेत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- खेळाचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनेक तरुणांना नोकरीचा लाभ मिळवून देणारा तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी रमेश शशिकांत गाढे नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पोलिसांनी त्याला मंगळवारी पहाटे घरातून ताब्यात घेतले.

बनावट क्रीडा प्रावीण्यपत्र तयार करून त्याची विक्री करून पैसा कमावण्याचा गोरख धंदा गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. टाकळीभान येथील रमेश गाढे हा राहुरी कृषी विद्यापीठात नोकरीस आहे.

बनावट क्रीडा प्रावीण्यपत्र बनवून तो विक्री करीत होता. खेळाच्या दर्जानुसार १ लाख ते ४ लाखांपर्यंत तो त्या प्रमाणपत्राची विक्री करीत होता.

नागपूर पोलिसांना या बनावट प्रमाणपत्राची माहिती मिळाल्याने त्यांनी शेवगाव येथील रमेश याचा साथीदार बबन गायकवाड याच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला अटक केली होती.

बबन याच्या माहितीनुसार नागपूर पोलिसांनी मंगळवारी पहाटे तीन वाजता रमेशला राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. चौकशीसाठी त्याला नागपूर येथे नेण्यात आले.

नेटबाॕॅल, रोप स्कीपिंग, कराटे व इतर खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र विक्री करून तरुणांना सरकारी नोकरीचा लाभ मिळत आसल्याने अनेक तरुण त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe