रस्ता लूट करणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, वाढत्या चोऱ्या, दरोडे आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांनी देखील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

नुकतीच रस्ता लूट करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केला आहे. याबाबत श्रीरामपूर येथील शाहरुख अन्वर कॉंथमिरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

२ नोव्हेंबर २०२० रोजी ते त्यांच्या मोटरसायकलवरून शिरसगाव रोडने जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला.

या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर ‘पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार

त्यांच्या पथकाने श्रीरामपूर येथे जाऊन आरोपी गौरव संजय रहाटे (रा. दत्तनगर, श्रीरामपूर) याला शिताफीने ताब्यात घेतले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरलेला मोबाईलही काढून दिला.

त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या आधीही दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रस्ता लूट करणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर असून रस्तावर गस्त वाढवण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment